देवळा :- वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या हॉटेल वर छापा टाकून देवळा पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे.
पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या माहितीनुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या सुचनेप्रमाणे देवळ्याचे पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, सपोनि पुष्पा आरणे यांच्या पथकाने देवळा येथील हॉटेल वेलकममध्ये चालु असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई करुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असुन, हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळा पोलीस ठाणे हद्दीतील मालेगाव रोडजवळील हॉटेल वेलकम येथे हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे (रा. देवळा) हे हॉटेलवर गरजु महिलांना पैशांचे आमिष दाखवुन स्वताच्या अर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसायासाठी घेवुन येवुन डांबून ठेवुन त्यांचे कडुन बळजबरीने वेश्याव्यवसाय करुन घेत आहे. या माहिती नुसार पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, पोउपनि दामोदर काळे, ग्रेड पोउपनि विनय देवरे, पोहवा इंद्रजित बर्डे, पोहवा. नितिन बाराहाते, पोलीस अंमलदार श्रावन शिंदे, संदिप चौधरी, महिला पोलीस अंमलदार माधुरी पवार, स्वाती चव्हाण तसेच सपोनि पुष्पा आरणे, पोलीस अंमलदार योगेश तनपुरे, ऋषिकेश सपकाळे, मनोहर मोहारे, सुनिल गांगोडे. सुनिल जगताप पो.हवा. आश्विन धोत्रे यांनी सापळा रचुन हॉटेल वेलकमवर रात्री छापा टाकुन हॉटेलचे मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे यांना ताब्यात घेतले.
पंटरच्या मदतीने खात्री केली असता वेश्याव्यवसायासाठी डांबुन ठेवलेल्या महिला वरील मजल्यावर असलेबाबत खात्रीलायक माहीती मिळाल्याने पथकातील महिला अंमलदार यांचे मदतीने त्यांची सुटका केली.
सदर ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य साधने तसेच रोख रुपये व सोन्याचांदीचे दागिने तसेच मोबाईल फोन मिळून आले. सदर डांबुन ठेवलेल्या महिलांकडे विचारपुस करता त्यांनी सांगितले की, आम्हाला वेश्याव्यवसायासाठी हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव ठाकरे यांनी बोलावुन घेवुन या ठिकाणी पैसे देण्याचे बदल्यात डांबुन ठेवल्याचे सांगितले.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर महिलांची सुटका केली असुन हॉटेल मॅनेजर दिपक सुकदेव याचेविरुद्ध पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचे फिर्यादीवरुन देवळा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3.4.5.6 व भारतिय न्यायसंहिता 2023 च्या कलम 143(1), 143(2), 143 (3) अन्वये दे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मॅनेजर दिपक ठाकरे यास अटक न्यायालयात उभे करून न्यायालयाने सोमवार दि 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून,अधिक तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते करीत आहेत. सदर गुन्ह्यातील पिडीत महिला या बांगलादेशी असल्याचा संशय असुन त्यादृष्टीने सखोल तपास सुरु आहे.