कळवण प्रशासकीय कार्यालयात आलेल्या नागरिकांवर मधमाश्यांचा हल्ला, २५ ते ३० जण जखमी
कळवण प्रशासकीय कार्यालयात आलेल्या नागरिकांवर मधमाश्यांचा हल्ला, २५ ते ३० जण जखमी
img
दैनिक भ्रमर

कळवण (धनंजय बोरसे) :- कळवणपासून चार किमी अंतरावर  कोल्हापूर फाटा परिसरात राज्य मार्ग 17 कळवण - नाशिक लगत असलेल्या कळवण मध्यवर्ती  प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीवरील दुसऱ्या मजल्याच्या भिंतीला खिडकीजवळ तब्बल पाच ठिकाणी बसलेल्या भौर मधमाशांनी काल या ठिकाणी शासकीय कामासाठी आलेल्या महिला, तरुण, वृध्द, लहान मुले यांना चावा घेत  हमला केला.

यात पिळकोस येथील अमोल पगारे (वय २८), प्रियंका पगारे (वय २३), शिव पगारे (वय ४) तर देवळा, मेशी येथील दोन वृध्द आजोबांचा या हमल्यामुळे बीपी वाढला असल्याचे समजते.

अश्या २५ ते ३० (नावे समजू शकली नाहीत) नागरिकांना हमला करत चावा घेतला. जवळच असलेल्या चणकापूर उजव्या कालव्याला नुकतेच आवर्तन आले असल्यामुळे सैरावैरा पळत सुटणाऱ्या नागरिकांनी कालव्यात उड्या टाकून चावा घेणाऱ्या मधमाशांपासून  सुटका केली.

मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या  तीन मजली इमारतीत प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय पोलिस अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास, सहाय्यक निबंधक, तालुका कृषी,बांधकाम विभागीय कार्यालय असे सर्व शासकीय कार्यालयाची दालने असून या कार्यालयात कामानिमित्त तालुक्यातील खेड्यापाड्यातू मोठ्या संख्येने नागरिक आपल्या शासकीय  कामकाज निमित्त येत असतात, काल दुपारी मधमाशांनी कार्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ जमावावर हल्ला केला.

याप्रसंगी या आवारात मोठी धावपळ उडाली. मधमाश्यांच्या भीतीने नागरिक सैरावैरा पळत निघाले. बचावासाठी वीस ते तीस  नागरिकांनी थेट कालव्याच्या पाण्यात उड्या घेतल्या. जखमीनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी स्वतः  दाखल होत उपचार घेतले.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group