बांधकाम साईटवर पाणी मारतांना तीस-या मजल्यावरून पडल्याने २० वर्षीय मजूराचा मृत्यू
बांधकाम साईटवर पाणी मारतांना तीस-या मजल्यावरून पडल्याने २० वर्षीय मजूराचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर
नाशिक - बांधकाम साईटवर पाणी मारत असतांना तीस-या मजल्यावरून पडल्याने २० वर्षीय मजूराचा मृत्यू झाला. हा प्रकार पेठरोडवरील राऊ हॉटेल परिसरात घडला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किरण खंडेराव अंभुरे (मुळ रा. परभणी हल्ली पवन हाईटस,राऊ हॉटेल समोर) असे मृत कामगाराचे नाव आहे. अंभुरे शुक्रवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास पवन हाईटस या बांधकाम साईटवर पाणी मारत असतांना ही घटना घडली.

तिस-या मजल्यावर पाणी मारत असतांना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने बांधकाम व्यावसायीक वत्स पटेल यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.

अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group