शिंदेंचा एक खासदार ड्रग्स...... ; संजय राऊतांच्या आरोपानं राजकीय वर्तुळात खळबळ
शिंदेंचा एक खासदार ड्रग्स...... ; संजय राऊतांच्या आरोपानं राजकीय वर्तुळात खळबळ
img
Dipali Ghadwaje
राज्यात सातत्याने अंमली पदार्थांप्रकरणी मोठ्या कारवाया सुरू आहेत. ललित पाटीलनंतर सापांच्या विषाची तस्करी प्रकरणात एल्विश यादवचं नाव समोर आलंय. या सर्वांवरून खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच शिंदेंच्या गटातील एक खासदार देखील ड्रग्स घेतो असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. 

सापाच्या विषाची तस्करी करणारा, रेव्ह पार्टीत सापाच्या विषातून तयार होणाऱ्या अंमली पदार्थाची तस्करी कराणारा एल्विश वर्षा बंगल्यावर गेला होता. तिथे एखाद्या सुपर हिरो सारखं त्याचं स्वागत केलं गेलं. त्याला मिठ्या मारल्या गेल्या. त्यानंतर शिंदेंच्या गटातील एका खासदाराने त्याला आपल्या घरी नेलं. सदर खासदार स्वत: अंमली पदार्थांचे सेवन करत आहे. याबाबत माझ्याकडे पक्की माहिती असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय.

गणेशोस्तवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी एल्विश देखील वर्षावर गेला होता. त्यावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केलाय.

महाराष्ट्रासह देशामध्ये अंमली पदार्थांचा जो व्यापार सुरू आहे त्याची सूत्रे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांपर्यंत या व्यक्तीला कोणी पोहचवलं. त्यांच्या टोळीतील ती व्यक्ती कोण आहे? याचं उत्तर राज्याच्या गृहमंत्र्यांना द्यावं लागले, असंही संजय राऊत म्हणाले.

माझं अमित शहांना आवाहन आहे. कारण हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत पोहचलाय तर त्याचं काय कारण आहे, असं संजय राऊत म्हणाले. राज्यातील अंमली पदार्थांप्रकरणातील एल्विश यादव आणि ललित पाटील यांच्याकडून प्रोटेक्शन मनी दिलं जातंय, असा आरोपही राऊतांनी यावेळी केलाय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group