मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात तीन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात तीन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक
img
Dipali Ghadwaje

मनमाड (वार्ताहर) :- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील दुसखेडा स्थानकात रिमोडलिंगमध्ये अप-डाउन लूप लाइनच्या कामासाठी आज दुपारी 2 वाजेपासून सायं. 5 वाजेपर्यंत तीन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील धावणार्‍या प्रवासी रेल्वेगाड्यांना विविध स्थानकांत थांबा देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

या कामामुळे गाडी क्रमांक 22710 आदरा-नांदेड एक्स्प्रेस ही गाडी इटारसी नरखेड, बडनेरा, अकोलामार्गे वळवण्यात आली आहे. तर भुसावळहून येणार्‍या गाडी क्र. 12108 सीतापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस सावदा स्थानकात तीन तास, गाडी क्र . 22688 वाराणसी-मैसूर एक्स्प्रेस निंभोरा स्थानकात 2 तास 55 मिनिटे, गाडी क्र. 11072 वाराणसी-लोकमान्य टिळक कामायनी रावेर स्थानकात 2 तास 45 मिनिटे, गाडी क्र. 15029 गोरखपूर-पुणे एक्स्प्रेस वाघोडा स्थानकात 2 तास, गाडी क्र.11058 अमृतसर-मुंबई बुर्‍हानपूर स्थानकात 1 तास 30 मिनिटे, गाडी क्र. 22530 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस असिरगढ स्थानकात 1 तास, गाडी क्र. 11062 जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस चांदनी स्थानकात 5 मिनिट, गाडी क्र. 19014 कटनी-भुसावळ एक्स्प्रेस नेपानगर स्थानकात 20 मिनिटे, तसेच भुसावळकडे जाणार्‍या गाडी क्र. 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्स्प्रेस भुसावळ स्थानकात 2 तास 50 मिनिटे, गाडी क्र. 15647 लोकमान्य टिळक टर्मिनस-दिब्रुगड एक्स्प्रेस भुसावळ स्थानकात 1 तास 55 मिनिटे, गाडी क्र. 12534 मुंबई-लखनऊ एक्स्प्रेस भुसावळ स्थानकात 1 तास 45 मिनिटे, गाडी क्र. 2268 मैसूर-वाराणसी एक्स्प्रेस भादली स्थानकात 1 तास 40 मिनिटे, गाडी क्र.19045 सुरत-छपरा एक्स्प्रेस जळगाव स्थानकात 1 तास 40 मिनिटे थांबविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group