नाशिकरोडला काही तासात दुसऱ्या
नाशिकरोडला काही तासात दुसऱ्या "अनिकेत" ची आत्महत्या; चेहडी येथील युवकाने घेतली दारणेत उडी
img
Chandrakant Barve


नाशिकरोड (प्रतिनिधी):- घरात किरकोळ वाद झाल्याने चेहडी गावातील अविवाहित तरुणाने दारणा नदीत आत्महत्या केली. अग्निशमक दल त्याचा शोध घेत आहे. गेल्या चोवीस तासात दुसऱ्या अनिकेतने आत्महत्याचे पाऊल उचल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

   चेहडीगाव येथील राहणारा अनिकेत संजय बोराडे (वय 22) या तरुणाचे काल रविवार रात्री घरात किरकोळ वाद झाला. राग अनावर झाल्याने अनिकेत याने मित्राची मोटार सायकल घेऊन तो निघून गेला. बराच वेळ झाल्याने अनिकेत न आल्याने मित्रानी त्याला फोन वरून विचारले असता त्याने सांगितले की मी दारणा नदी बंधारा येथे असून मी आत्महत्या करीत आहे.

तात्काळ मित्रानी धाव घेतल्या नंतर दारणा बंधारा येथे मोटरसायकल व अनिकेत चा शर्ट मिळून आला. घटनास्थळी चेहडी येथील रहिवासी व पोलीस दाखल झाले. अग्निशमक दलाला रात्री शोध कार्य करण्यास अडचणी येत असल्याने आज सकाळ पासून अग्निशमक दलाचे शांताराम गायकवाड, राजू आहेर, राजू खर्जूल, तानाजी भास्कर,उमेश गोडसे, मनोज साळवे, श्रीरंग आडके हे बोटीच्या व गळाच्या साहाय्याने नदीपत्रात शोध घेत आहे.
     
दोन दिवसापूर्वी नाशिकरोड येथील प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ मयूर सरोदे यांच्या अनिकेत या मुलाने इमारतीवरून उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली त्याला काही तास उलटत नाही तोच चेहडी येथील अनिकेतने नदी पात्रात स्वतःचे आयुष्य बुडवून टाकल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group