Nashik : टायर फुटून ट्रक पलटी; ट्रक खाली सापडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Nashik : टायर फुटून ट्रक पलटी; ट्रक खाली सापडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
निफाड : काल  सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान विंचूरहुन नैताळेकडे जाणारा १६ टायर ट्रक नैताळेच्या पुर्वेला असलेल्या दत्तमंदीर येथे टायर फुटल्याच्या कारणास्तव पलटी झाला मात्र याच वेळी रस्त्याने पाई प्रवास करीत असलेला यशराज प्रकाश बोरगुडे  (वय २०) हा त्या ट्रक खाली सापडल्याने त्याचा जागीच अपघाती मृत्यु झाला आहे. त्याच्या या अपघाताने नैताळे शहरावर शोककळा पसरली आहे . 

याप्रकरणी  निफाड  पोलिसांनी मोटार अपघाताचा गुन्हा रात्री उशिरा दाखल केला आहे.  याबाबत निफाड  पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की,  काल  सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान विंचूरहुन नैताळे कडे भुसा भरलेला १६ टायर ट्रक क्रमांक एम एच १५ एच एच ६६८७ हा नैताळे शहराच्या पूर्वेला असलेल्या दत्त मंदिराजवळ क्लीनर साईटचे पुढील टायर फुटल्याने पलटी झाला , याच दरम्यान याच रस्त्यावरून पाई प्रवास करीत असलेला नैताळे येथील यशराज प्रकाश बोरगुडे (वय-२०) हा त्या ट्रक खाली दाबल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

रात्री ११.३० वाजता शोकाकुल वातावरणात नैताळे अमरधाममध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत निफाड पोलिसांनी मोटार अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खरात हे करीत आहे
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group