नाशिकरोड (प्रतिनिधी) : नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अंकुश शिंदे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही. आय. पी. सुरक्षा राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे बदली झाली आहे. संदीप कर्णिक हे सध्या पुणे येथे सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. अंकुश शिंदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार दि. 17 डिसेंबर 2022 रोजी स्वीकारल्यानंतर नाशिकमधील गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.
दरम्यान, ललित पाटील प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. 11 महिन्यांतच त्यांची बदली झाल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत.