विहितगांव येथील लोहमार्ग पोलिसाचे दुर्दैवी निधन
विहितगांव येथील लोहमार्ग पोलिसाचे दुर्दैवी निधन
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी) :  मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यातील कर्मचारी व विहितगांव येथील रहिवासी रेहान निसार शेख (वय 32)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्यावर देवळालीगाव येथील कब्रस्थानमध्ये शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

लोहमार्ग पोलिसातील जवान रेहान शेख यांच्या आयुष्य ची सुरवात अतिशय खडतर झाली. त्याच्या लहानपणी आई वडील त्याना सोडून गेले. स्वतः च्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षाचा अभ्यास सुरु ठेवला. पोलीस दलात जाण्याचा निर्धार असल्याने त्यानी पोलीस भरती मधून प्राविण्य मिळवीत लोहामर्ग पोलिसात आपले स्थान निर्माण केले.

गेली दहा वर्ष अनेक रेल्वे स्थानकात प्रामाणिक काम केले.मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या सेवेत असताना एक वर्षांपूर्वी पासून किडनी स्टोन चा आजार जडला.अनेक शर्थी चे प्रयत्न करून झाल्यानंतर त्याचे नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दुर्दैवी निधन झाले.

त्यांच्यावर देवळाली गाव कब्रस्थान येथे मनमाड लोहामर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, उपनिरीक्षक बशीर शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश पवार, बाजीराव बोडके, महिंद्र पाटील, रवींद्र खाकर, गजानन धायडे, महिंद्र माळी यांनी मानवंदना देत शासकीय इतमामात विधिवत दफनविधी केला. रेहान शेख यांच्या पश्चात पत्नी व एक चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. नाशिकरोड व मनमाड पोलिसात रेहान यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group