पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारला!
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार स्वीकारला!
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी ) : पोलीस सर्वांना बरोबर घेऊन विकासाच्या दृष्टिकोनातून कामकाज करतील गुन्हेगारांना कदापीही माफ केले जाणार नाही. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ही कायम राखली पाहिजे यासाठी पोलीस वचनबद्ध आहेतच, भयमुक्त  नाशिक हे आमचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातूनच पावले उचलली जातील, अशी स्पष्ट भूमिका नवनियुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मांडली. 

पुणे शहर पोलिस सहआयुक्त पदावरुन नाशिक पोलिस आयुक्तपदी बदली झालेल्या संदीप प्रकाश कर्णिक यांनी शुक्रवारी (24 नोव्हेंबर) रोजी दुपारी बारा वाजता राज्य गुप्तवार्ता आणि व्हीआयपी सुरक्षा विशेष पोलिस महानिरीक्षक पदी बदली झालेले माजी आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. 

त्यावेळी उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे,  सोमनाथ तांबे,  हे अधिकारी आयुक्तांच्या दालनात उपस्थित होते.

पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, नासिक हे अतिशय चांगले शहर आहे. यातील नागरिकांना भयमुक्त शहर मिळावे,  यासाठी यापूर्वी आलेल्या पोलीस आयुक्तांनी देखील  प्रयत्न केले आहेत.  त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले आहे. आम्ही देखील त्याच दृष्टिकोनातून पावले उचलून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांना भयमुक्त आणि चांगले शहर वाटावे या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत असे सांगून ते पुढे म्हणाले की, ‘नाशिकमध्ये कोअर पोलिसिंगवर भर देणार आहोत. पोलिसांचा रिस्पॉन्स अधिक चांगला होण्यासंदर्भात कार्यवाही होईल. ड्रग्ज प्रकरणात यापूर्वी झालेल्या तपासाबाबत आढावा घेत पुढे अधिक ठोस कारवाई करणार आहोत.

शहरातील काही प्रश्नाबाबत वेगवेगळ्या संस्थांशी देखील चर्चा करावी लागणार आहे. शासकीय कार्यालयांशी देखील चर्चा करून त्यातून प्रश्न मार्गी लावले जातील. वाहतूक व्यवस्था अधिक चांगले आणि सुरु होण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की,पुणे, मुंबई व नाशिक तिन्ही पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे’, असे कर्णिक म्हणाले. तर, माजी आयुक्त शिंदे यांच्या कारकीर्दीत नाशिकमध्ये प्रभावी पोलिसिंग झाल्याचेही सांगुन कर्णिक पुढे म्हणाले की , प्रत्येक शहरातील गुन्हेगारी, तेथील कार्यपद्धती व पोलिसिंग करण्याबाबत काही बदल असतात. 

त्यानुसार नाशिक शहराची योग्य गरज ओळखून वेळोवेळी पोलिसिंगमध्ये बदल कण्यात येतील. कार्यरत मनुष्यबळात उत्कृष्ट सेवा देतानाच नागरिक केंद्रीत पोलिसिंग आणि त्यातून फीडबॅक घेत बदल करण्यावर भर असेल. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group