नवाब मलिक यांचं ठरलं, अजित पवार की शरद पवार गटात?
नवाब मलिक यांचं ठरलं, अजित पवार की शरद पवार गटात?
img
Dipali Ghadwaje
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली. यावेळी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. सभागृह परिसरात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची गळाभेट झाली. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, हे अधिवेशन वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले आहे. त्यातच आजपासून सुरु होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक देखील सहभागी झाले आहेत. नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहे.तर आतापर्यंत त्यांनी आपण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटापैकी कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. 

दरम्यान आमदार नवाब मलिक हे कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत कालपासून चर्चा सुरू असतानाच, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मलिक हे सत्तधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले आहे. त्यामुळे आता मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे चर्चा पाहायला मिळत आहे. 

अधिकृत भूमिका स्पष्ट नाहीच...
वैद्यकीय जामिनावर बाहेर आल्यावर नवाब हे शरद पवार गटात की अजित पवार गटात जाणार याबाबत मोठी चर्चा झाली. मात्र, यावेळी मलिक यांनी कोणतेही भूमिका न घेता तटस्थ राहणे पसंद केले. त्यामुळे मलिक कोणत्या गटात सहभागी होणारा यावरून वेगवेगळ्या चर्चा झाल्या. दरम्यान, हिवाळी अधिवेशनासाठी पोहचलेल्या मलिक यांनी सत्ताधारी बाकांच्या शेवटी बसणे पसंद केले. असे असलं तरीही मलिक यांनी अधिकृत भूमिका मात्र अजूनही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group