भरधाव डंपरची रिक्षाला जोरदार धडक, ५ शाळकरी विद्यार्थ्यी.......
भरधाव डंपरची रिक्षाला जोरदार धडक, ५ शाळकरी विद्यार्थ्यी.......
img
Dipali Ghadwaje
रस्त्ये अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. अनेकांनी त्यात आपले जीव देखील गमावले आहे. अशातच पुण्यातील चांदणी चौकात भरधाव डंपरने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षेतील ५ विद्यार्थी जखमी झाले आहेत.  

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर रिक्षा विद्यार्थ्यांना घेऊन एक रिक्षा मुंबई बेंगळुरू महामार्गावरून जात होती. दरम्यान मार्गावरील भुयारी मार्गातील रिक्षा आणि डंपरची धडक झाली. रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या रिक्षेत शाळकरी विद्यार्थी होते, ते सर्व विद्यार्थी एमआयटी ग्रुप स्कूलचे असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमी झालेल्या ५ विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांना एशियन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एका विद्यार्थ्याला दुसऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group