नाशिक जिल्हांसह शहरातही बिबट्याचा वावर वाढला आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील संत कबीरनगर – वनविहार कॉलनीजवळ बिबट्या आढळला. या बिबट्याने लोकवस्तीत हल्ला चढवला. बिबट्याच्या हल्ल्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यासह २ नागरिक जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर जिल्हा रुग्णलयात उपचार सुरु आहे.
परिसरातील भयभीत नागरिकाकडून या बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत होती. पोलिस तसेच वनविभागाकडून या परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान वन विहार कॉलनीतील बिबट्या अथक प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय.