नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिकरोड परिसरातील जय भवानी रोड, औटे मळा येथील दोन वर्षीय कृतीका आकाश गिरी हिचा अंगावर गरम पाणी पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ ऑक्टोबर रोजी कृतीका घरात खेळत असताना चुकून तिच्या अंगावर गरम पाणी पडले. त्यामुळे तिच्या पोटावर व पाठीवर गंभीर फोड आले. तत्काळ तिला उपचारासाठी सीएचएन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी आडगाव येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले.
तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक साळवे करत आहेत. निष्पाप बालिकेच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.