नगरपालिका-नगरपंचायती निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा
नगरपालिका-नगरपंचायती निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा
img
चंद्रशेखर गोसावी



नाशिक -  जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या नावांची घोषणा आज केली. 

राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि नगरपंचायती यांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या नावाची घोषणा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. 

होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी येवल्याकरता निवडणूक अधिकारी म्हणून बाबासाहेब गाढवे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार आहेर, मनमाड नगरपालिकेसाठी महेश जमदाडे तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेषराव चौधरी, सिन्नर नगरपालिकेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अभिजीत नाईक तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अभिजीत कदम, ओझर नगरपालिकेसाठी आप्पासाहेब शिंदे मुख्य निवडणूक अधिकारी तर किरण देशमुख सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघणार आहेत. पिंपळगाव बसवंतसाठी निफाडचे प्रांत अधिकारी असलेले शशिकांत मंगरूळ हे मुख्य निवडणूक अधिकारी असतील तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रेया देवचक्के या सहाय्यक निवडणूक अधिकारी असतील, इगतपुरी करता अभिजीत बरावकर हे मुख्य निवडणूक अधिकारी असतील तर धीरज भामरे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी असतील, त्र्यंबकेश्वर करता गणेश जाधव हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील तर राहुल पाटील हे सहाय्यक निवडणूक अधिकारी असणार आहेत. नांदगाव करता सुनील सौदाणे हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील तर शामकांत जाधव हे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहे. सटाणा नगरपालिकेकरता कैलास चावडे हे मुख्य निवडणूक अधिकारी असतील तर ज्योती भगत या सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम बघणार आहेत. भगूर नगरपालिकेकरता पंकज पवार हे मुख्य निवडणूक अधिकारी असतील तर सचिन कुमार पटेल हे सहाय्यक निवडणूक अधिकारी असतील. चांदवड नगरपालिकेकरता मिलिंद कुलकर्णी हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील तर दिनेश सिनारे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम बघतील.

याबाबतचा आदेश हा तातडीने लागू करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group