सातपूर परिमंडळातील मौजे चांदशी येथील रोकडे मळा परिसरात आज पहाटे बिबट्या जेरबंद झाला.
कालच चेहडी येथे माजी नगरसेवक पंडित आवारे यांच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला होता. आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी नाशिक शहर परिसरात पुन्हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिक धास्तावले आहेत.
चांदशी येथे संजय सुकदेव रोकडे यांच्या मालकीच्या गट नंबर 65/1/2 मधील मळ्यात वन विभागाने पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात वन्यप्राणी सुमारे ३ वर्षांचा मादी बिबट रेस्क्यू झाला आहे.
वनविभागाने त्याला ताब्यात घेतले असून प्राथमिक तपासणी व पुढील कार्यवाहीसाठी वन्यप्राणी उपचार केंद्र, म्हसरूळ येथे घेऊन गेले आहेत.