कॅफेत तरुण तरुणींचे अश्लील कृत्य ; आमदाराकडून कॅफेची तोडफोड
कॅफेत तरुण तरुणींचे अश्लील कृत्य ; आमदाराकडून कॅफेची तोडफोड
img
दैनिक भ्रमर

तरुण आणि तरुणींना अनैतिक कृत्यासाठी कॅफेची जागा दिल्याचा आरोप चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी केला आहे. चव्हाणांनी या कॅफेची तोडफोड देखील केली आहे. 

मंगेश चव्हाण यांनी पोलिसांसह केलेल्या छापेमारीत तरुण-तरुणी गैरकृत्य करताना आढळून आल्याचं समोर आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या मंगेश चव्हाण यांनी कॅफेची तोडफोड केली.  

गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका अनाधिकृत कॅफेमध्ये तरुण-तरुणींना अनैतिक कृत्य करण्यासाठी कॅफे मालकाडून जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलिसांसह आमदर मंगेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज पोलिसांच्या पथकासह आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅफेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी अंधारात काही तरुण-तरुणी आढळून आले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी या कॅफेची स्वतःच तोडफोड केली.

“शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या कॅफेबाबत मी मागील वर्षीदेखील कॅफे चालकाला समज दिली होती. त्यानंतर काही काळासाठी या ठिकाणी सुरू असलेला हा प्रकार बंद देखील झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कॅफेमध्ये पुन्हा अनैतिक प्रकार सुरू झाल्याची माहीत सामोर आल्याने नगर पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मी या ठिकाणी आलो. यावेळी या ठिकाणी गैरकृत्य करताना तरुण-तरुणी आढळून आले आहेत”, असं मंगेश चव्हाण यांनी सांगितलं.

“अशा प्रकारची गैरकृत्य कोणी करत असेल आणि त्याला कोणी जागा उपलब्ध करून देणार असेल तर ते कदापिही खपून घेतले जाणार नाही. वेळ पडली तर अशा इमारतींवर बुलडोझर देखील फिरविला जाईल”, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group