मोठी दुर्घटना : धावपट्टीवर विमानाला भीषण आग
मोठी दुर्घटना : धावपट्टीवर विमानाला भीषण आग
img
Dipali Ghadwaje
टोकियो: टोकियोच्या हानेदा विमानतळावर मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे 
टोकियोच्या हानेदा विमानतळावर जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. स्थानिक मीडियाने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये जपान एअरलाइन्सचे विमान हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

 याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , विमान आणि जपान तटरक्षक दलाच्या विमानात झालेल्या टक्करमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विमानातील 350 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. टोकियो अग्निशमन विभागाने ही माहिती दिली. वाहतूक आणि पर्यटन मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे सांगितले.
 
विमानाला आग लागली तेव्हा विमानात 350 लोक होते. मिळालेल्या  माहितीनुसार, विमानातील सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना टळली.  सध्या विमानाला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group