नाशिक : डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना कामटवाडे परिसरात घडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद वसंतराव इंगळे व आनंद आंबेकर हे दोघे मित्र आहे. आज सायंकाळी दोघे दारू पिण्यासाठी कामटवाडे परिसरात बसले होते.
तेव्हा इंगळे ने आनंद आंबेकरला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने आंबेकरने आनंद इंगळेच्या डोक्यात फरशी मारली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी तपासाची सूत्रे फिरवत संशयित आनंद आंबेकरला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.