बंदुकीचा धाक दाखवून
बंदुकीचा धाक दाखवून "या" स्टार क्रिकेटपटूला लुटले
img
दैनिक भ्रमर

दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यातच या स्पर्धेमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू फॅबियन अॅलन याला बंदूकीच्या धाकाने लुबाडल्याचं प्रकरण समोर आले. त्यामध्ये त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. क्रिकबजनं याबाबतचं वृत्त दिले आहे. फॅबियन एलन याच्यासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

यावेळी हल्लेखोरांनी 28 वर्षीय फॅबियन अॅलन याला जोहान्सबर्ग येथील प्रसिद्ध सन हॉटेलजवळ घेरलं. त्याला बंदूकीच्या धाकावर धमाकवत त्याच्याकडून स्मार्टफोन आणि बॅग हिसकावलं. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

फॅबियन अॅलन याच्यासोबत घडलेल्या या दुर्देवी घटनेला पार्ल रॉयल्स आणि वेस्ट इंडिज क्रिकेटनं दुजोरा दिला. फॅबियन अॅलन यांच्या जिवाला कोणताही धोका झाला नाही. वेस्ट इंडिज बोर्डाच्या प्रतिनिधीने फॅबियन अॅलन यांच्यासोबत चर्चा केली. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group