घरातून निघून गेलेल्या विवाहितेसह दोन लहान मुलांचा मृतदेह सापडल्याने खळबळ
घरातून निघून गेलेल्या विवाहितेसह दोन लहान मुलांचा मृतदेह सापडल्याने खळबळ
img
दैनिक भ्रमर

लासलगाव (शेखर देसाई) :- ५ फेब्रुवारी पासून दोन मुलांसह घरातून निघून गेलेल्या महिलेचा आणि तिच्या दोन्ही मुलांचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.

सौ ज्योती जालिंदर कोटकर आणि त्यांची दोन मुले हरीश जालिंदर कोटकर (वय ८) आणि कृष्णा जालिंदर कोटकर या मायलेकांचे मृतदेह आज सायंकाळी शेळकेवाडी येथे आढळून आल्याने लासलगाव पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जालिंदर भानुदास कोटकर रा. शिवापूर (शेळकेवाडी) यांची पत्नी ज्योती जालिंदर कोटकर, मुलगा हरिष जालिंदर कोटकर वय 8, कृष्णा जालिंदर कोटकर (सर्व रा. शिवापूर, शेळकेवाडी) दिनांक 5/2/2024 सकाळी 8 वाजता घरातून निघून गेल्यानंतर आज त्यांचे मृतदेह सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मिळून आले.

लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उद्ये तातडीने शेळकेवाडी येथे दाखल झाले व त्यांनी मृतदेहांचा पंचनामा केला. या प्रकरणी दुर्दैवी ज्योतीचे बंधू ललित कैलास कापसे रा. निफाड सोनेवाडी रोड यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान दुर्दैवी ज्योतीही निफाड येथील कैलास लक्षण कापसे यांची कन्या असून ही घटना उघडकीस आल्यानंतर लासलगाव पोलीस कार्यालयात आणि निफाड ग्रामीण रुग्णालयात तिच्या मार्च नातेवाईकांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group