नाशिकरोडला महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; खून झाल्याची चर्चा
नाशिकरोडला महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; खून झाल्याची चर्चा
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी):- नाशिकमध्ये गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे. सततच्या खूनांच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत.


उपनगर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या एल आय सी रोडवर आज एका महिलेचा मृतदेह मिळून आला असुन त्या महिलेची हत्या झाल्याचे बोलले जाते.

नाशिकरोड एकलहरा येथे सिडको येथील युवकाची हत्या झाली होती. त्याला चोवीस तास होत नाही तोच परभणी बीड येथील एक महिला बेपत्ता होती. तिचा मृतदेह गुरुद्वारा समोरील शिखरेवाडी कडे जाणाऱ्या रोडवर एका बांधकाम साईट वर मिळून आला.

याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे समजते. शव विच्छेदनासाठी या महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

त्याचा अहवाल आल्यानंतरच हत्या आहे की नाही हे समजू शकेल असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group