नाशिकच्या प्रसिद्ध यशवंत मंडईवर लवकरच पडणार हातोडा
नाशिकच्या प्रसिद्ध यशवंत मंडईवर लवकरच पडणार हातोडा
img
दैनिक भ्रमर


नाशिक (प्रतिनिधी) :- रविवार कारंजावरील धोकादायक व जीर्ण झालेली यशवंत मंडई ही इमारत बुलडोजर फिरवून जमीनदोस्त केली जाणार आहे. न्यायालयाने काल यशवंत मंडई पाडू नये, यासाठी न्यायालयात गेलेल्या व्यावसायिक व गाळेधारकांची मागणी फेटाळली आहे.

धक्कादायक! निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी, एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

मनपाने केलेला व गाळेधारकांनी त्यांच्यातर्फे केलेला स्ट्रक्चरल ऑडिट महत्वपूर्ण ठरले असून ही इमारत धोकेदायक असल्याचा निष्कर्ष दिला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रविवार कारंजा परिसरात यशवंत मंडईची चार मजली इमारत आहे.

साधारण 60 वर्षांपूर्वी मनपाने ती बांधली होती. ही इमारत जुनी व जीर्ण झाल्याने धोकेदायक बनली होती.त्यातील अनेक भाडेकरुंनी ही इमारत सोडली. पण तळमजल्यावरील अनेक गाळे भाडेकरुंनी ही इमारत सोडण्यास नकार दिला. मनपाने त्रयस्थ संस्थेकडून या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यात ही इमारत धोकेदायक असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र गाळे भाडेकरूंना हा अहवाल मान्य नव्हता. ही इमारत भक्कम असल्याचा दावा करत त्यांनी मनपा विरोधात न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने ही इमारत पाडण्यावर स्थगिती दिली. तसेच गाळे भाडेकरुंना या इमारतीचा त्रयस्थ संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर करण्यास सांगितले. न्यायालयाकडे मनपा व गाळेभाडेकरुंचे असे दोन्ही स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल अभ्यासले व दोघांनी ही इमारत अतिशय धोकादायक असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे न्यायालयाने गाळे भाडेकरुंची याचिका फेटाळल्याने आता लवकरच ही मोडकळीस आलेली नाशिक महानगरपालिकेची मिळकत असलेली यशवंत मंडई भुईसपाट केली जाणार आहे.

विधानसभा अध्यक्षांची सर्वात मोठी कारवाई; भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित

दरम्यान शहराची वाढती लोकसंख्या व वाहनतळाची  होणारी मोठी अडचण लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेकडून या ठिकाणी भव्य असे वाहनतळ उभे केले जाणार आहे. त्याचा पूर्ण आराखडा आर्थिक तरतुदी केलेली असून लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group