नाशिक प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना राजीव गांधींप्रमाणे बॉम्बस्फोटात उडवून धमकी देणारा फोन आल्या आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांच्या माहितीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हा हल्ला होईल असा नाशिक पोलिसांना फोन आला होता, पोलिसांनी त्वरित फोन करण्याऱ्या व्यक्तीची माहिती घेतली. हा फोन माहात्मानगर परिसरात राहणाऱ्या श्रीराम जोशी या व्यक्तीने केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान मानसिक तणावातून हा फोन केल्याची कबुली जोशी यांनी दिली आहे. जोशी याना अनेक वर्षणापासून दारूचे व्यसन आहे. पोलसांनी त्यांना जेव्हा ताब्यात घेतले तेव्हाची जोशी दारूच्या नशेत होते.