नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून आज सकाळी पंचवटीत खुनाची घटना घडल्याचे समजते.
गोदाघाट परिसरातील चक्रधर स्वामी मंदिर जवळील घटना घडल्याचे समजते. हाणामारीतून एकाने भिक मागणाऱ्या इसमाचा खून झाल्याचे समजते. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. दोघांनी खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
किरकोळ भांडणं विकोपाला गेल्याने यातून ही घटना घडल्याचे समजते.