सातपूरमध्ये अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार
सातपूरमध्ये अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- अल्पवयीन मुलीस घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित अल्पवयीन मुलगी व आरोपी मुलगा हे सातपूर परिसरातील रहिवासी आहेत. आरोपी मुलाने दि. २८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास या मुलीला त्याच्या घरी भेटण्यासाठी बोलावले.

त्यानुसार ही मुलगी त्याच्या घरी गेली असता आरोपी मुलाने जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group