आज राज ठाकरेंची जाहीर सभा : काय बोलणार या कडे अवघ्या राज्याचे लक्ष
आज राज ठाकरेंची जाहीर सभा : काय बोलणार या कडे अवघ्या राज्याचे लक्ष
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते. त्यांच्याकडे मते, खासदार नसले तरी देशभरात महाशक्ती म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष केवळ एक आमदार असलेल्या मनसे या पक्षाकडे अपेक्षेने पहातो आहे. राज्यातील सत्तेच्या लंबकात शहरी, तरूण व हिंदू मतांचे ध्रुवीकरण आपल्या बाजूने करायचे तर त्या मतांवर प्रभाव असणारे राज ठाकरे आपल्या कंपूत असायला हवेत, यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून त्यांच्या हयातीत कांही नेते बाहेर पडले. दुसऱ्या पक्षांच्या वळचणीला जावून बसले. राज ठाकरे हे त्यांचे पुतणे. जे त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेले. बाळासाहेबांचा वारसा, वक्तृत्वाचे, नेतृत्वाचे गुण असतानाही आपल्याकडे शिवसेनेचे नेतृत्व न येता उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार हे कळताच ते वेगळे झाले. त्यांनी इतर पक्षातन जाता स्वत:चा नवा पक्ष मनसे स्थापन केला.

कर्नाटक सीमेवर पोलिसांकडून मोठी कारवाई ; 'हि' स्फोटके जप्त

मराठी माणसाच्या हक्कांच्या रक्षणासाठी स्थापलेल्या या पक्षाच्या स्थापनेला १८ वर्षे उलटून गेली आहेत. बरोबर अठरा वर्षांनी याच राज ठाकरेंना भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साद घालताहेत. ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा व्यक्त करताहेत. अलिकडच्या काळात मनसेचा जनाधार कमी झाला असला तरी भाजपला राज हवे आहेत. आजवर दोघांच्या एकत्र ज्या अडचणी होत्या, त्यातील सर्वात मोठी म्हणजे उद्धव ठाकरे यांचा राज यांना असलेला विरोध अन्‌ दुसरा म्हणजे उत्तर भारतीयांबद्दलचा राज यांच्या पक्षाचा विरोध. खरे तर छोट्या ठाकरेंच्या पक्षात भय्या होते, आहेत. त्यामुळे खरा अडथळा होता तो उद्धव ठाकरेंचा. आज ते भाजपसमवेत नाहीत. त्यामुळे शत्रुचा शत्रू तो मित्र व्हावा, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

‘मोदींनी पंतप्रधान व्हावे’, असे जाहीर विधान करणारे राज केवळ पाच वर्षांपूर्वी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत केवळ मोदीच नव्हे तर भाजपवर प्रश्न उपस्थित करत होते. आता सगळे बदललेय. राज समवेत आले तर ठाकरे मिळतील. ठाकरेंशिवाय भाजपला महाराष्ट्रात प्रचार करता येत नाही वाटते, असा शेरा उद्धव यांनी मारला आहेच. राज केवळ १५ दिवसांपूर्वी दिल्लीला जावून आले आहेत. अमित शहा यांच्या भेटीला विनोद तावडे त्यांना जातीने घेऊन गेले. तरीही राज यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ते काय सांगतील त्यावर बरेच अवलंबून आहे. भाजपबद्दल त्यांनी काही बोलणे हे पक्षाला अडचणीत आणणारे ठरू शकेल. लोकसभेत भाजपच्या धोरणांना पाठिंबा दिला, विधानसभेत काही जागा मागितल्या तर पाठोपाठ येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसेचे काही कार्यकर्ते निवडून येण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group