नाशिकरोड मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी मध्ये तुंबळ हाणामारी
नाशिकरोड मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी मध्ये तुंबळ हाणामारी
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-येथील भारतीय जनता पार्टी चे माजी नगरसेवक व पदाधिकारी कामगार नेता यांच्या मध्ये दत्त मंदिर चौकात तुंबळ हाणामारी झाल्या घटना काल संध्याकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील एक माजी नगरसेवक व प्रेसचे माजी कामगार नेते हे भाजपा पदाधिकारी नेहरू नगर समोरील उपनगर पोलीस ठाण्यारस्त्यावरील केंद्रीय विद्यालय येथे महायुती च्या उमेदवाराच्या प्रचार्थ बूथ वर काम करीत होते. संध्याकाळी निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर बूथवर नेमलेल्या कार्यकर्तेच्या पैशांवरून दोघां मध्ये वाद झाले.

त्यात माजी नगरसेवकाने कामगार नेत्याच्या कानशिलात लगावली. त्यात कामगार नेत्याच्या चष्माचे नुकसान झाले. ही वार्ता त्यांच्या कुटूंबातील सदस्य यांना समजल्यानंतर त्यांनी दत्तमंदिर चौकात एका दुकाना समोर बसलेल्या माजी नगरसेवक यांना विचारण्यासाठी गेले, तिथे या दोघांत पुन्हा तुफान हाणामारी झाली.

याबाबत दोघा पदाधिकारी यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता एकमेकांच्या कामाची ईर्षा निर्माण झाली व वरिष्ठ पदाधिकारी यांना चुकीची व जाणीव पूर्वक विरोधात माहिती पुरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष अतुल धनवटे, रिपाई गवई गटाचे जिल्हाध्यक्ष भारत पुजारी, व सामाजिक कार्यकर्ते यांनी हा वाद मिटवाला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दाखल केली नाही. या हाणामारीची चर्चा रात्री उशिरा शहर भरात पसरली. मात्र भाजपा पदाधिकारी यांनी याबाबत कानावर हात ठेवत या प्रकारची माहिती नसल्याचे सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group