जिभेला वाईट ते चांगलं, चांगलं ते वाईट असं झालंय - राज ठाकरे
जिभेला वाईट ते चांगलं, चांगलं ते वाईट असं झालंय - राज ठाकरे
img
Dipali Ghadwaje
मुंबई : सध्या आपल्या जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. बिझी लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये जागतिक बाल लठ्ठपणा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत झाली. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. जागतिक बाल लठ्ठपणा दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

लठ्ठपणा संदर्भात दोन प्रकार पाहायला मिळतात. अर्बन लाईफ स्टाईलमध्ये आणखी लठ्ठपणा वाढतोय. नरेंद्र मोदीजी यांनी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेचा यावर उपचार घ्यायला फायदा होतोय. या संदर्भात केंद्र सरकार देखील खूप उपाय योजना करत आहेत. लठ्ठपणा संदर्भात एक सर्व्हे झाला आणि याचे उपचार वाढले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे सरकारने प्रत्येक शाळेत दोन शिक्षक ट्रेन करायचे आणि विद्यार्थी यांच्यावर लक्ष ठेवून कॉन्सिलिंग करायची. देशात हा प्रोग्राम हातात घ्यायचं पूर्ण सुरु आहे. आता विशेषतः राज्य व केंद्र सरकारने पीटीचा तास अनिवार्य केले आहे. विना मैदानाची शाळा सुरु करता येणार नाही. अनेक मुलं मैदानात जात नाहीत, डिजिटल गेम खेळतात. त्यामुळे खेलो इंडिया सारखी मोहीम सुरु झालीय. राष्ट्रीय खेळात अनेक मुलांचं सहभाग वाढत आहे. पालकांना ही आता वाटतं खेळात मुलांचं करिअर होतंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी मिश्किल उत्तरे दिली. सध्या मुलांमध्ये वाढलेल्या लठ्ठपणावर उत्तर देताना विविध पैलूंवर प्रकाश टाकला. वजन कसं कमी करायचं असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरे यांनी त्यावर भाष्य केलंय. वजन कसं कमी करायचं हे मला कळलं असतं तर मी वजन कमी केलं नसतं का? गेम खेळले पाहिजेत. डॉक्टर माझ्या आयुष्यात आले. माझं वजन वाढू लागलं. मी रोज बॅडमिंटन खेळतो त्यातून 470 कॅलरी कमी होतात. त्यामुळे मी योग्य मार्गांवर आहे. लठ्ठपणा आजार आहे हे पालकांना कळायला मार्ग नाही. डॉक्टर तुम्ही यासाठी काही शोधलं पाहिजे. बाहेरचं फास्ट फूड आल्यावर हे सगळं वाढलंय. जिभेला वाईट ते चांगलं चांगलं ते वाईट असं झालंय, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. जपान मध्ये का कुठेतरी डब्बेच मुलांना आणू देत नाही. शाळेतच मुलांना जेवण बनवलं जातं, सर्व मिळून… शाळेतच चांगलं अन्न मिळालं तर कशाची गरज नाही. दरम्यान या मुलाखतीच्या एका प्रश्नाला फडणवीसांना दिल्लीला जायचंय, मी चायनीजची ऑर्डर दिलीये, आम्ही निघतो, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group