महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त उद्या काँग्रेस भवन येथे सकाळी दहा वाजता अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे . स्वर्ग विलासराव देशमुख जयंती निमित्त नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विलासराव देशमुख प्रेरणा पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे .
यावर्षी प्रथम पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक श्री सुरेश भटेवरा यांना देण्यात येणार असल्याची माहिती नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.
तसेच स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी नाशिक शहरातील व राज्यातील प्रख्यात व्यक्तींना देण्यात येणार असल्याची ही माहिती श्री छाजेड यांनी दिली.
काँग्रेस भवन येथे अभिवादन कार्यक्रम झाल्यानंतर हा पुरस्कार सुरेश भटेवरा यांची वैयक्तिक भेट घेऊन नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिरीष कोतवाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस डॉ . शोभाताई बच्छाव प्रदेश सरचिटणीस डॉ . हेमलताताई पाटील , प्रदेश सचिव राहुल दिवे , ज्येष्ठ नेते शाहू खैरे , नाशिक शहर काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र बागुल व अन्य पदाधिकारींच्या उपस्थित देण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमाला सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक शहर अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, नाशिक शहर सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, नाशिक शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, नाशिक जिल्हा एन एस यु आय चे अध्यक्ष अल्तमश शेख, नाशिक शहर ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार, नाशिक शहर अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, नाशिक शहर अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष संतोष ठाकूर, नाशिक शहर सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष अण्णा मोरे, कार्यालयीन सरचिटणीस राजकुमार जेफ, तसेच अन्य विभाग सेल आघाड्यांच्या प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.