म्हसरूळला युवकाची दगडाने ठेचून हत्या
म्हसरूळला युवकाची दगडाने ठेचून हत्या
img
दैनिक भ्रमर
नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत अशोक तोडकर (वय २८, रा. आदर्शनगर, रामवाडी, नाशिक) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. हा युवक रिक्षाचालक असून तो सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. सदर युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे बोलले जात असून शनिवारी दिवसभर हा युवक घरी होता.

परंतु, रात्री तो घराबाहेर पडला होता, असे समजते. त्यानंतर आज सकाळी आठ वाजता मयत युवकाच्या भावाला पोलिसांकडून त्याचा खून झाल्याची माहिती समजली. प्रशांतच्या पश्चात दोन भाऊ, एक बहिण आणि आई वडील असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मारेकऱ्याचा शोध सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group