नाशिक (प्रतिनिधी) :- एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एका इसमाने विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले.
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. 1 सप्टेंबर 2020 ते दि. 16 ऑगस्ट 2023 या तीन वर्षांच्या कालावधीत एका इसमाने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. या काळात त्याने तिच्या राहत्या घरी, त्याच्या घरी, निफाड, त्र्यंबकेश्वर, नाशिकरोड अशा विविध ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर त्याच्या नातेवाईकांनी शिवीगाळ व दमदाटी करीत तिला मारहाण केली.
पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीसह त्याच्या नातेवाईकांवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक हांडोरे करीत आहेत.