सुपर मॉम तन्वी चव्हाण- देवरे यांनी खाडी पार करत केला विक्रम
सुपर मॉम तन्वी चव्हाण- देवरे यांनी खाडी पार करत केला विक्रम
img
दैनिक भ्रमर

 नाशिक (नाना खैरनार)- एकीकडे भारत भारतीय क्रिकेट संघ विशेष शिक्षक स्पर्धा जिंकत असताना दुसरीकडे नाशिककरांना आणखी एक खुशखबर मिळाली ती तन्वी चव्हाण- देवरे  यांच्या विक्रमी कामगिरीने.

रिले जलतरणमध्ये खाडी पार करण्याची कामगिरी  चव्हाण- देवरे यांनी केली होती. शनिवारी त्यांनी 42 किलोमीटरची खाडी पार करताना 17 तास इतका कालावधी घेत यशस्वीरित्या कामगिरी केली, ते 33 वर्षीय तन्वी देवरे या दोन मुलांची आई असून, भारतातील पहिल्या महिला खेळाडू ठरल्या आहेत.

ही कामगिरी करत असताना फ्रान्समधील जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांचा देखील सामना तन्वी  यांना करावा लागला. त्यांनी यशस्वीरीत्या खाडी पार केल्याने नाशिक मधील त्यांचे चाहते कुटुंबीयांनी जल्लोष करत तनवी यांचे अभिनंदन केले आहे.

इंग्लिश चॅनेल स्पर्धेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर तनवीने आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत मोठ्या जिद्दीने मुख्य कोच बेंगलोर येथील श्रीकांत विश्वनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला मुख्यकोच यांनी दिलेल्या स्विमिंग प्रोग्राम नुसार तिने काही दिवस बेंगलोर येथे आणि मग नाशिक येथे सेवानिवृत्त साई जलतरण प्रशिक्षक श्री शंकर मालगुंडी यांच्या मार्गदर्शनाखाली रोज सात ते आठ तास स्विमिंगचा सराव सुरू केला तर आठवड्यातून एकदा 11 ते 15 तास स्विमिंग चा सराव केला. 

तन्वीने 2010 पासून स्विमिंगचा सराव बंद केल्यानंतर लहानपणी पाहिलेले स्वप्न साकार करण्याची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. लग्न झाल्यानंतर तिला दोन जुळी मुले आहेत व ते आज सहा वर्षाचे आहेत. अशा परिस्थितीत स्वप्न साकार करण्यासाठी तन्वीने पुन्हा नव्या उमेदीने आणि जिद्दीने 2023 मध्ये सरावास सुरुवात केली. या तिच्या प्रयत्नात तिला सासरच्या आणि माहेरच्या सर्व लोकांची उत्तम साथ मिळाली आणि ते सर्व नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी सरावाच्या वेळी उपस्थित असतात.

तन्वी स्विमिंगचा सराव करण्यासाठी नाशिक मनपाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, त्याचप्रमाणे केन्सिंग्टन क्लब हाऊस येथील जलतरण तलाव येथे जाते. यासाठी तिला मनपा आयुक्त, जलतरण तलाव येथील कर्मचारी तसेच केन्सिंग्टन क्लब हाऊस यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group