सारडा सर्कल ते मुंबई नाका परिसरातील 5 रोहित्रांचा वीज पुरवठा सायंकाळ पर्यंत सुरळीत होणार
सारडा सर्कल ते मुंबई नाका परिसरातील 5 रोहित्रांचा वीज पुरवठा सायंकाळ पर्यंत सुरळीत होणार
img
Dipali Ghadwaje
महावितरणच्या ११ केव्ही गंजमाळ विद्युत  वाहिनीवर मोठे झाड पडल्यामुळे ४ विद्युत खांब कोसळले आहेत. त्यामुळे सारडा सर्कल ते मुंबई नाका या परिसरातील 20 रोहित्र बंद झाले असून जवळपास १,५०० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला आहे. 

या ठिकाणी महावितरणचे अभियंते व  जनमित्र कार्यरत असून विद्युत खांब उभारणीचे काम सुरू आहे. यासोबतच वीज पुरवठा इतर वाहिनीवरून पर्यायी मार्गाने सुरू करण्याचे काम चालू आहे. ५ रोहीत्रांचा वीज पुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरळीत करण्यात येईल, असे महावितरणच्या वतीने कळविण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group