नाशिक :- एक लाख रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्यास लाचुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.किसन भीमराव कोपनर (वय 44) उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. पिंपळगाव उपविभाग, ता. निफाड, जि. नाशिक. असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे दुकानाचे व्यावसायिक इलेक्ट्रिक मीटर कोणतेही कायदेशीर प्रक्रिया न राबविता काढून घेऊन त्याठिकाणी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे दिनांक 04/07/2024 रोजी लाचेची मागणी केली. दरम्यान 1,00,000/- रुपये लाचेची रक्कम आज स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचेवर पिंपळगाव पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाम चालू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी केली.