लासलगाव- निफाड तालुक्यातील सावरगाव येथील अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेऊन पिडीतेवर बलात्कार केल्याप्रकरणी सावरगाव येथील रमेश श्रावण माळी याला 20 वर्षे जन्मठेपेची व तीस हजार रुपयांची दंडाची शिक्षा,निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए व्ही. गुजराथी यांनी ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की सावरगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस दिनांक २०/३/२०२० रोजी फुस लावून पळवून नेऊन रमेश श्रावण माळी याने वेळोवेळी शारिरिक संबंध ठेवून गरोदर केले.
या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिस कार्यालयात फिर्याद दाखल झाल्यानंतर भादंवि कलम ३७६ (३) आणि पोकसा कायदा कलम ४,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करुन निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.
न्यायालयापुढे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील ॲड. आर. एल. कापसे यांनी सरकार पक्षातर्फे ९ महत्वपुर्ण साक्षिदार तपासले. न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी आरोपी रमेश श्रावण माळी यास दोषी ठरवून 20 वर्षाची जन्मठेप आणि तीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष कैद अशी शिक्षा झाली ठोठावली. या खटल्यात पिंपळगाव पोलीस कार्यालयाचे अधिकारी पोलिस हवालदार एस जी. शिरोळे यांनी काम पाहिले.