अवैध दारू वाहतूक प्रकरणी गुजरात मधुन दोघांना अटक, गाडी जप्त
अवैध दारू वाहतूक प्रकरणी गुजरात मधुन दोघांना अटक, गाडी जप्त
img
चंद्रशेखर गोसावी
नाशिक - अवैधरिता दारूची वाहतूक करताना चांदवड जवळ झालेल्या अपघात प्रकरणी आणि दारू वाहतूक प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुजरात मधून दोघांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक मध्ये दमन नवसारी या भागातून अवैधरित्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यावरून  राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाने या प्रकरणी सापळा रचून कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना अपेक्षित असलेली गाडी ही येताना दिसली आणि त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी कारवाईला सुरुवात केली.

मात्र गाडी चालकाने त्यांना हुलकावणी देत ती गाडी नाशिक शहरातून निफाड आणि नंतर चांदवड या मार्गे फिरवत असताना चांदवड जवळील हरनुल या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला कट मारल्याने त्या गाडीचा अपघात होऊन या अपघातात गाडी चालकाचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना गाडीचा चालक देवेश कांतीलाल पटेल याला बलसार मधून अटक केली तर अधिक तपास करताना गाडी क्रमांक जी जे 19 डी इ 88 86 ही गाडी नवसारी येथील अश्फाक अली मोहम्मद शेख हा अवैध दारूसाठी घेऊन गेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकणाचा पुढील तपास सुरू  आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group