रक्षकच बनला भक्षक!पित्याने स्वतःच्या १३ वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार
रक्षकच बनला भक्षक!पित्याने स्वतःच्या १३ वर्षीय मुलीवर केले लैंगिक अत्याचार
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घरात कोणी नसल्याची संधी साधून पित्यानेच स्वत:च्या अल्पवयीन मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली.

याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की फिर्यादी या दि. 25 एप्रिल रोजी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. ही संधी साधून तिच्या पतीने घरात कोणीही नसल्याची संधी साधून स्वत:च्या 13 वर्षीय मुलीला जवळ घेऊन तिच्याशी सलगी करत तिला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. तसेच त्याचा मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ तुझ्या आईला दाखवीन, अशी धमकी देऊन नराधम बापाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार एप्रिल महिन्यापासून सुरू होता.

दरम्यान पिडीत मुलीच्या आईला पतीचा हा प्रकार समजल्यानंतर तिने काल म्हसरूळ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हाके करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group