नाशिक :- 12 हजार रुपये लाचेची मागणी करून 7 हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ यांच्यासह एकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
वाडीवर्हेच्या महावितरण कार्यालयातील वरीष्ठ तंत्रज्ञ नागेश्वर रघुनाथ पेंढारकर (वय 35) व शुभम रामहरी जाधव (वय 23) अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वाडीवर्हे गावातील दोन कमर्शियल व एक घरगुती मीटर पेंढारकर यांनी बसवून दिले होते.
त्याबद्दल बक्षीस म्हणून पेंढारकर यांनी तक्रारदाराकडे 12 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 7000 रू स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम पेंढारकर यांनी एका खाजगी इसमाकडे देण्यास सांगीतले. तेव्हा ही लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोना अजय गरुड, पोना प्रभाकर गवळी, मपोशि शितल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.