नाशिक (प्रतिनिधी) :- व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. तिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी दीपक नंदलाल कुशवाह (वय 23, रा. मेदगेनगर, पाटील पार्क, अंबड लिंक रोड, नाशिक) याने पीडित युवतीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्याशी मैत्री केली.
त्यानंतर दि. 15 सप्टेंबर 2018 ते दि. 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आरोपी कुशवाह याने पीडित मुलीची इच्छा नसताना पाथर्डी फाटा येथील रॉयल हॉटेल, त्र्यंबक रोडवरील हॉटेल साईकिनारा व पपया नर्सरी येथील हॉटेल अन्नपूर्णा येथे नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करून त्याचे व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेला त्रास दिला.
म्हणून अंबड पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी दीपक कुशवाह याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कारंडे करीत आहेत.