Nashik Crime : दाम्पत्याकडून महिलेची 40 लाख रुपयांची फसवणूक
Nashik Crime : दाम्पत्याकडून महिलेची 40 लाख रुपयांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- व्यवहारात ठरलेले लॅब इन्स्ट्रूमेंट न देता एका दाम्पत्याने महिलेची 40 लाख रुपयांना फसवणूक केल्याची घटना घडली असून, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेल्या महिलने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की त्या व्यावसायिक आहेत. त्यांना लॅब इन्स्ट्रूमेंट घ्यायचे होते. त्यासाठी त्या त्याचा शोध घेत होते. त्यादरम्यान आरोपी राजेंद्र दुर्गाप्रसाद (वय 50) व अनिता राजेंद्र दुर्गा मोदी (वय 55, दोघेही रा. नाशिक) यांना ही माहिती समजली. त्यानंतर मोदी दाम्पत्याने फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर या दाम्पत्याने संगनमत करून त्यांची भेट घेतली. “तुम्हाला लॅब इन्स्ट्रूमेंट मिळवून देतो,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. 

हे ही वाचा : ड्रग्ज माफिया भूषण पाटील व अभिषेक बलकवडे पोलिसांच्या ताब्यात; उत्तर प्रदेश मधून घेतले ताब्यात

त्यानंतर मोदी दाम्पत्याने लॅब इन्स्ट्रूमेंट देण्यासाठी आगाऊ रक्कम लागेल. त्यासाठी पैसे द्यावे लागतील,” असे सांगितले. त्यावेळी फिर्यादीकडून आरोपी मोदी दाम्पत्याने दि. 1 जानेवारी 2020 ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत एकूण 39 लाख 32 हजार 78 रुपये स्वीकारले. त्यानंतर फियार्दीला सुरुवातीला 2 लाख 62 हजार 971 रुपये किमतीचे इन्स्ट्रूमेंट देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर बरेच दिवस उलटूनही दिलेल्या रकमेपैकी उर्वरित रकमेचे इन्स्ट्रूमेंट दिले नाही, त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपी दाम्पत्याकडे विचारणा केली असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करून नकार दिला व पैसे परत न देता फसवणूक केली. 

ही बाब लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात मोदी दाम्पत्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group