मोठा आवाज झाला अन् ......!  चिपळूणमध्ये जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ, काय घडले??
मोठा आवाज झाला अन् ......! चिपळूणमध्ये जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ, काय घडले??
img
Dipali Ghadwaje
चिपळूणमध्ये एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर उड्डाण पुलाचं काम सुरू असताना या उड्डाण पुलाचा गर्डर अचानक तुटला. सुदैवाने या परिसरात कोणी नसल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटल्याचा प्रकार घडला आहे. यादरम्यान पुलाच्या खाली नागरिकांची एकच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ही घटाना घडली. 

गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे. पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group