टिळकवाडीत बांधकाम साईटवर मृतदेह आढळल्याने खळबळ
टिळकवाडीत बांधकाम साईटवर मृतदेह आढळल्याने खळबळ
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- शहराच्या मध्यवर्ती असलेल्या टिळकवाडी भागात एका बांधकाम साइटवर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, टिळकवाडीत रामायण बंगल्याच्या शेजारी भाविक बिल्डर्सचे बांधकाम सुरू आहे. आज या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह येथे अनेक दिवसांपासून असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

याबाबत पोलिसांना विचारले असता हा घातपात नसून त्या तरुणाचा जास्त प्रमाणात दारू सेवन केल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group