सिन्नर-घोटी रोडवर ट्रकच्या धडकेत दोन ठार
सिन्नर-घोटी रोडवर ट्रकच्या धडकेत दोन ठार
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- सिन्नर- घोटी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.  या बाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश डावरे आणि दुर्गेश डावरे (दोघेही रा. कोनांबे) हे दोन युवक पल्सर मोटारसायकल (क्र. एम.एच.15-9645) हे  हरसूलहून सिन्नरकडे येत होते.

त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकच्या धडकेने दोघेही युवक जागीच ठार झाले. सिन्नर येथील रतन सोनवणे, पुरुषोत्तम भाटजिरे आणि राहुल शिरसाठ यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group