भीषण अपघात : भरधाव कंटेनरची कारला धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू  ; कुठे घडली घटना?
भीषण अपघात : भरधाव कंटेनरची कारला धडक, 4 जणांचा जागीच मृत्यू ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
पुण्यातून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत भरधाव कंटेनर आणि कारची भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर कंटेनर पुलाच्या मध्यभागी अडकल्याची घटना घडली आहे.पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाट्यावर ही अपघाताची घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र चौघ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी  रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
पुणे-सातारा महामार्गावरील देगाव फाट्यावर ही अपघाताची घटना घडली आहे. पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनरची एका कारला धडक बसली होती. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश चक्काचूर झाला. त्याचसोबत कंटेनरचे स्वत:वरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलाच्या मध्यभागी जाऊन अडकली होती. त्यामुळे या अपघातात दोन्ही वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. 

या घटनेत सुदैवाने कोणताही जिवीतहानी झाली नाही आहे. मात्र चौघे जण गंभीररित्या जखमी आहेत. या जखमींवर उपचार सूरू आहेत. या भीषण अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र या घटनेची माहिती राजगड पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत वाहतूक सुरळीत केली आहे.तसेच या घटनेचा अधिकचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group