येवला : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठ्यांचा संघर्ष योद्धा मनोज जरांगेपाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून तालुक्यातील सुरेगाव रस्ता राज्यमार्ग क्रमांक 30 वरील जाणाऱ्या येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पंतप्रधान यांच्या जाहिरातीला काळे फासून सरकारचा निषेध करत आहे.
एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण, जय शिवराय अशा घोषणा देत आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने 40 दिवस मागून घेतले तरीही मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे याचा निषेध म्हणून तालुक्यातील सुरेगाव रस्ते येथील मराठा आंदोलकांनी तीव्र भूमिका घेत
आज दुपारी हातात झेंडा घेऊन राज्य महामार्गावरील बसेस अडवून बसवर लावलेल्या जाहिरातीमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला काळे फासून आंदोलन करण्यात आले.