खा. हेमंत गोडसे यांचा खासदारकीचा राजीनामा
खा. हेमंत गोडसे यांचा खासदारकीचा राजीनामा
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- राज्यात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक होताना दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड तर कुठे निदर्शने करण्यात येत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याचे लोण नाशिक जिल्ह्यात ही पसरले आहे. आज भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : आंदोलनकर्त्यांनी फोडले "या" आमदाराचे कार्यालय 

त्यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासुन मराठा समाज आरक्षणासाठी झटत आहे. आरक्षण नसल्याने शिक्षण मिळणेकामी मराठा समाजातील मुलांची मोठी कुचंबना होत आहे. गुणवत्ता असुनही फक्त आरक्षण नसल्याने विद्यार्थी प्रगतीपासून वंचित राहत आहेत. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक मागास नाही असा अहवाल आयोगाने यापूर्वी दिलेला असला तरी याविषयी पुनःच एकदा फेरसर्वेक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. चार वर्षांपूर्वी समाजाच्या वतीने राज्यभर शांततामय मुकमोर्चे काढत आरक्षणाच्या मागणीकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले होते. दरम्यानच्या काळात आरक्षण मिळाल्याची घोषणा झाली असली तरी अगदी काही दिवसातच न्यायालयाच्या कसोटीवर आरक्षण बाद झाले. सर आपण मुख्यमंत्री झाल्यावर आपण आरक्षणाच्या मुद्यावर आपले लक्ष केंद्रित केले.

आरक्षणाचा विषय आपण अतिशय उत्तम पद्धतीने हाताळत आहात. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्याच्या सभेत आपण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घेतल्याने माझ्यासह राज्यातील तमाम मराठा समाजाच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झालेली आहे. परंतु वेळेचे महत्त्व अनन्यसाधारण असतं. आरक्षणासाठी मागील महिनाभरापुर्वी समाजाने पुन्हा तीव्र अमरण उपोषण सुरू केले होते. दिलेल्या मुदतीत शासनाकडुन आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने त्यांनी मागील आठवड्यापासून पुन्हा आरपारच्या लढाईसाठी समाजातील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.

हे ही वाचा : पाय घसरून पडलेल्या लहान भावाला वाचवायला गेला अन् तोही बुडाला; नाशिक जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
https://dainikbhramar.com/news/v/832/two-brothers-died-in-river

यामुळे राज्यभरातील तमाम मराठा समाजामध्ये आता आरक्षण मिळालेच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही अशी ती भावना निर्माण झाली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असल्याने मराठा समाजाच्या भावनांचा आता राज्यभर उद्रेक होऊ लागला आहे. मराठा समाजाच्या तीव्र भावना विचारात घेऊन मी आपल्या पक्षाचा लोकसभा सदस्य असल्यामुळे माझ्या खासदारकीचा राजीनामा आपणाकडे सादर करीत आहे.

तरी मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर त्यांना आरक्षण मिळवून द्यावे ही नम्र विनंती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group