सिटीलिंक बसमधून अतिरिक्त व्यावसायिक सामान नेल्यास होणार तिकीट आकारणी,
सिटीलिंक बसमधून अतिरिक्त व्यावसायिक सामान नेल्यास होणार तिकीट आकारणी, "या" तारखेपासून होणार अंमलबजावणी
img
दैनिक भ्रमर

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या माध्यमातून सद्यस्थितीत २४४ बसेसच्या माध्यमातून एकूण ५६ मार्गावर बससुविधा पुरविण्यात येते.

यामध्ये नाशिक शहराबरोबरच नाशिक शहरापासून २० कि.मी च्या आत येणार्‍या सिन्नर, पिंपळगाव, दिंडोरी, मोहाडी, सुकेणा, सैयद्द पिप्री, त्र्यंबकेश्वर, गिरणारे, सायखेडा अशा ग्रामीण भागाकरिता देखील बससेवा पुरविण्यात येते. या ग्रामीण भागातून शहराकडे अनेक प्रवासी व्यवसायानिमित्त येतात.

सोबत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सामान (लगेज) असते. त्यामुळे आता अशा व्यावसायिक सामानावर तिकीट आकारणी करण्याचा निर्णय सिटीलिंकच्यावतीने घेण्यात आला आहे.

हेही वाचा : खा. हेमंत गोडसे यांचा खासदारकीचा राजीनामा
https://dainikbhramar.com/news/v/834/mp-hemant-godse-resigned-as-mp


प्रवासी सामान ( लगेज ) चे तिकीट दर आकारणी करणेबाबत नियमावली खालील प्रमाणे :-

१) प्रवाशास शहर बसने प्रवास करतांना प्रवासासाठी आवश्यक असलेले *प्रवाशी सामान* प्रती प्रवाशी १० किलो पर्यन्त नेण्यास मोफत सवलत राहील. त्यापुढील प्रत्येकी १० किलो  ग्रॅम ला त्या प्रवासाचे पूर्ण तिकीटाची आकारणी करण्यात येईल. उदा. ०-१० किलो –पूर्णतः मोफत, ११-२० किलोकरीता एक प्रवासी भाडे, २१-३० किलोकरीता दोन प्रवाश्यांचे भाडे इत्यादि. याप्रमाणे आकारण्यात येईल.   

२) प्रवासादरम्यान *व्यावसायिक सामान* जवळ बाळगल्यास कोणतीही सवलत दिली जाणार नाही. व्यावसायिक सामान असल्यास पुढील प्रमाणे तिकीट आकारणी करण्यात येईल उदा. ०-१० एक प्रवासी भाडे, ११-२० किलोकरीता दोन प्रवासी भाडे, २१-३० किलोकरीता तीन प्रवासी भाडे इत्यादि. याप्रमाणे आकारण्यात येईल.

३) प्रवाशांना आवश्यक प्रवाशी सामान वगळता व्यावसायिक सामान, इतर सामान बसमधून नेताना इतर  प्रवाशास कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची सदर प्रवाशाने दक्षता घ्यावयाची आहे. 

४) प्रवाशांस शहर बसने प्रवास करतांना, कोणत्याही प्रकारचे ज्वालाग्रही पदार्थ वाहून नेता येणार नाही. (उदा. पेट्रोल, गॅस, सिलेंडर, तसेच कुठलेही स्फोटक पदार्थ) 

५) प्रवाशांस शहर बसने प्रवास करतांना, कायद्याने वाहतुकीस मनाई करण्यात आलेले साहित्य,सामान, पदार्थाची वाहतूक करता येणार नाही. ( उदा. गांजा, दारू, हत्यारे )

६) प्रवाशांस शहर बसने प्रवास करतांना, दुर्गंधी येणारे पदार्थ, साहित्य, सामान वस्तु (प्रवाशांना त्रास होईल अशा वस्तु ) यांची वाहतूक करता येणार नाही.

७) प्रवाशांस शहर बसने प्रवास करतांना, शहर वाहतूक बससेवेतून पाळीव प्राण्यांची वाहतूक करता येणार नाही. 

८) प्रवाशांस शहर बसने प्रवास करतांना, शहर वाहतूक बससेवेमधून विनाधनी लगेजची वाहतूक करता येणार नाही. 

अश्याप्रकारे आता सिटीलिंक मधून प्रवासकरतेवेळी अतिरिक्त सामान बाळगल्यास तिकीट आकारणी करण्यात येणार आहे. दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पासून सदर निर्णयाची अंबलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे अतिरिक्त सामान बाळगणार्‍या प्र्वाश्यांनी वाहकासोबत कोणताही वाद न घालता नियमांनुसार तिकीट काढून सिटीलिंकला सहकार्य करावे, असे आवाहन सिटीलिंकने केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group