आजकाल अनेक आत्महत्या आणि गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत असून अनेक खळबळजनक घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बंद घरात बहीण भावाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला असून हे मृत्यू कोणत्या कारणाने झाले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही .
वसईच्या एका इमारतीमध्ये दोन मृतदेह मंगळवारी सकाळी सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचा मृत्यू 15 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. शवविच्छेदनानंतर हा खून आहे की अकस्मात मृत्यू हे स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर हा खून असावा असा संशय व्यक्त केला आहे.
वसईच्या एका बंद घरात बहिण- भावाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला आहे. घटना सोमवारची आहे. दोघा बहिण भावांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून पंधरा दिवसापूर्वीच राहत्या घरात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी उघड झाली आहे.
मयत हनुमंता श्रीधर प्रसाद (वय 40) आणि मोठी बहीण यमुना श्रीधर प्रसाद (वय 45) हे दोघे वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगल वंदन सोसायटीत राहतात. दोघे ही कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर 25 लाखाच कर्ज होतं. तसेच ऑफिसमधील काही लोक, मोठा भाऊ यांच्याकडून ते उसने पैसे मागत होते. दोघा बहिण भावांनी राहत्या घरात बेडरुममध्ये विषारी द्रव्य घेत आपलं जीवन संपवलं.
गेल्या पंधरा दिवसापासून घराचा दरवाजा न उघडल्याने घरातून दुर्गंधी येत होती. घरमालकाने सोमवारी दुपारी 112 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना बोलावून घेतलं. आचोळे पोलिसांनी बनावट चावीच्या साहय्याने घरात प्रवेश केला. घर उघडल्यानंतर दोघा बहिण भावांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करुन, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. सध्या आचोळे पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद करुन, पुढील तपास सुरु केला आहे.