आदर्श ब्रेड उद्योग समूहाच्या संचालिका गंगुताई धामणकर यांचे निधन
आदर्श ब्रेड उद्योग समूहाच्या संचालिका गंगुताई धामणकर यांचे निधन
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- येथील आदर्श ब्रेड उद्योग समूहाच्या संचालिका तसेच दानशूर श्रीमती गंगुताई धामणकर (वय 88) यांचे काल रात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे. 

गंगुताई धामणकर या पुणे विद्यार्थीगृह या संस्थेला नियमितपणे मदत करायच्या. त्यांच्या निधनाने या संस्थेचा आधारवड हरपल्याची भावना संस्थेच्या सभागृहात आयोजित शोकसभेत व्यक्त झाली.  गंगुताई धामणकर यांच्या निधनाने संस्थेचा आधारवड हरपला आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष राजेंद्र बोराडे यांनी केले. कार्यवाह संजय गुंजाळ यांनी उदार देणगीदार आणि संस्थेच्या आधारस्तंभ हरपल्याचे सांगितले. श्रीमती गंगुताई धामणकर या पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या हितचिंतक तसेच सल्लागार मंडळावर कार्यरत होत्या.

यावेळी संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व घटक यांनी दुःख व्यक्त केले. पुणे विद्यार्थीगृह या संस्थेच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोराडे, कार्यवाह संजय गुंजाळ, संचालक अमोल जोशी, महेश दाबक  व सर्व संचालक मंडळ  यांनी शोक व्यक्त केला. संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संबंधित सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. यानिमित्ताने संस्थेच्या सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

इतर बातम्या
नाशिक महानगरपालिकेचा

Join Whatsapp Group